एक्स्प्लोर
Pune Rain : पुण्यातील निंबज नगरला पाण्याचा वेढा; घरं पाण्यात, चिमुकल्या लेकीला खांद्यावर घेऊन बाप छातीभर पाण्यातून निघाला
Pune Rain News : पुणे शहरात रात्रभर पावसाचा जोर पाहायला मिळतोय. अर्ध्या शहराला अक्षरश: पाण्याने वेढलं आहे. घरांत पाणी घुसल्याने नागरिकांचा जीव मुठीत धरुन प्रवास सुरू आहे.
Pune Rain Update
1/11

मुसळधार पावसामुळे पुण्याची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. लोकांच्या घरात पाणी घुसून अख्खं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
2/11

घरातील जीवनोपयोगी वस्तू, खाटा, सिलेंडर पाण्यात वाहून गेले आहेत.
3/11

नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. बोटी, लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचली आहे.
4/11

अनेक जण स्वत:चा जीव मुठीत धरुन घरांच्या खिडकीत बसले आहेत. परिसरातील नागरीक घाबरले असून एकच तारांबळ उडाली आहे.
5/11

लेकीला खांद्यावर घेऊन वासुदेवरुपी बापाने पाण्यातून वाट काढली, अनेकांनी या बापलेकीला सुखरुप बाहेर काढण्यासाठी मदत केली. निंबज नगरमधील या दृश्याने सध्या मन हेलावून टाकलं आहे.
6/11

निंबज नगर, एकता नगर परिसरातील घरं पूर्णत: पाण्याखाली गेले आहेत.
7/11

अनेक कुटुंब जीव मुठीत धरुन पूरजन्य स्थितीतून बाहेर पडत आहेत.
8/11

गाड्या अक्षरश: पाण्यात गेल्याने नागरिकांची दैना झाली आहे.
9/11

खांद्यापर्यंत पाणी भरल्याने लोक घाबरुन गेले आहेत. वयोवृद्धांपासून लहानांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक मंडळं पुढे सरसावले आहेत.
10/11

रश्शीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढलं जात आहे. फक्त मौल्यवान वस्तू हातात घेऊन लोक घरातून निघाले आहेत.
11/11

अनेक लोक सोसायटीच्या टेरेसवर जाऊन बसले आहेत. बचावासाठी ते देखील लोकांना पाचारण करत आहेत.
Published at : 25 Jul 2024 10:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
























