एक्स्प्लोर
PHOTO : ऐन पावसाळ्यात संसार रस्त्यावर, पुण्यातील आंबिल-ओढातील कारवाईवर संताप
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/7646014a215dff1d58b29837d10ee84a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune_Action_on_House_Feature_Photo
1/11
![पुण्यातील आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/063a89d5f580a2bd0a54e7ae7dbd52535c0d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
2/11
![त्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/623dddbe3148f95a1170624691e858ba0cc12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली.
3/11
![बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/d29b20afe35bdf0d2f311864648f8476f2751.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
4/11
![पावसाळा सुरु असताना महापालिकेने जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण सुरु केल्याने स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/59fd13220fe32d2de8112e735aea37c29835c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळा सुरु असताना महापालिकेने जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण सुरु केल्याने स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
5/11
![पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यता येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/67a55bcefdec98d417172e11f90660c39ef02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यता येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे.
6/11
![आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/2bde76b7673be505521d0c42b6e940940a682.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं.
7/11
![या संदर्भात बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं आयुक्तांनी आश्वासन दिलं असतानाही आज सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/999b422a28db0f9100ebeb9d0ae6bd2b32c4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संदर्भात बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं आयुक्तांनी आश्वासन दिलं असतानाही आज सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
8/11
![आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/2cb1ed38b190e2ffecf1e91a177cf8224ea05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
9/11
![महापालिकेच्या वतीने कोणतीही नोटीस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/7732b2736b6690fa9aeea387cbe9cac230160.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महापालिकेच्या वतीने कोणतीही नोटीस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.
10/11
![या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथे राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न न करता महापालिका ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/b61356ca7edafff9be5a8e3855b37cc0bae11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथे राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न न करता महापालिका ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.
11/11
![पुण्यातील कारवाई प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मंत्रालयात ही ऑनलाईन बैठक होईल. या बैठकीला नगरविकास खात्याचे सचिव, पुणे आयुक्त, महापालिकेचे अधिकार, एसआरए अधिकारी उपस्थित असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/3d6cefd32c139f6242cf62e50b1ffd93d64ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील कारवाई प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मंत्रालयात ही ऑनलाईन बैठक होईल. या बैठकीला नगरविकास खात्याचे सचिव, पुणे आयुक्त, महापालिकेचे अधिकार, एसआरए अधिकारी उपस्थित असतील.
Published at : 24 Jun 2021 11:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)