एक्स्प्लोर
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
Pune Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहे, त्यांची पुण्यात सभा देखील पार पडणार आहे, मात्र, या सभेवर पावसाचे सावट दिसून येत आहे.
Pune Prepares for Prime Minister Modi's Visit
1/5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. पुण्यात उद्या देखील हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
2/5

हवामान विभागाने 27 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर जय्यत तयारीही सुरु आहे.
3/5

पुण्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. चिखल झालेल्या ठिकाणी माती, डांबर टाकण्याचं काम सुरू आहे.
4/5

पुढील दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या सभेच्या ठिकाणी या दृष्टीने तयारी सुरू आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे.
5/5

सभेच्या ठिकाणी मातीमुळे, पाण्यामुळे मोठा चिखल निर्माण झाला आहे, त्यातच पावसाचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे.
Published at : 25 Sep 2024 05:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या

















