एक्स्प्लोर
PM Modi Speech : भारतातील युवांमध्ये इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी; भाषणात काय म्हणाले पंतप्रधान मोदी!
PM Modi Speech : भारतातील युवांमध्ये इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी; भाषणात काय म्हणाले पंतप्रधान मोदी!
pm modi speech in nashik live updates pm modi visit maharashtra today on january 12
1/11

युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सरकारपेक्षा जास्त वेगाने काम केलं, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
2/11

माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो.
3/11

हा केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या धर्तीशी संबंध आहे. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारखी मातृशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नायकाला जन्म दिला. याच धर्तीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकरसारख्या महान नारीशक्ती देशाला दिली. याच धर्तीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर दिले.
4/11

नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी आज या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो. मी आवाहन केलं होतं जानेवारीपर्यंत आपण सर्व २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिराची साफसफाई करावी. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं.
5/11

मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा.माझ्या युवा सहकाऱ्यांनो, आपल्या देशातील ऋषी मुनींपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी युवाशक्तीला सर्वोपरी ठेवलं. श्री अरविंदो म्हणाले, जर भारताला आपलं लक्ष्य गाठायचं असेल तर भारताच्या युवकांना एक स्वतंत्र विचाराने पुढे जावं लागेल.
6/11

स्वामी विवेकानंद म्हणायचे, भारताची आशा ही भारताच्या युवकांच्या बौद्धिकतेवर, त्यांच्या विचारावर अवलंबून आहे. या दिग्गजांचं मार्गदर्शन आजही प्रेरणादायी आहे.
7/11

आज भारत जगातील टॉप ५ अर्थव्यवस्था आहे. ही भारताच्या युवकांच्या ताकद आहे.आज भारत जगातील टॉप ३ इकोसिस्टिममध्ये आला आहे.आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.
8/11

सहकाऱ्यांनो वेळ ही प्रत्येकाला एक संधी देते. वेळेचा हा सुवर्णक्षण आताचा अमृतकाळाचा हा कालखंड आहे. तुमच्याकडे संधी आहे, इतिहास रचण्याची, इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची.
9/11

आज आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीवर आहोत. या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक शिक्षणाची दारं उघडली. या सर्व महानव्यक्तांनी देशासाठी आयुष्य वेचलं. हे सर्व जगले ते फक्त देशासाठी, स्वप्न बघितलं ते देशासाठी, संकल्प केले ते सुद्धा देशासाठी. या सर्वांनी देशाला नवी दिशा दिली.
10/11

देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. येत्या कालखंडात तुम्ही असं काम करा की आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील.
11/11

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना चार मंत्र मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा. मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा. नवीन मतदारांनी मतदानासाठी नोंद करा
Published at : 12 Jan 2024 02:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट























