एक्स्प्लोर
PHOTO : प्रशासनाच्या अनास्थेमुळे गोदावरी प्रदूषित; पानवेलींचा विळखा, नदीकिनारी दुर्गंधी
Sangli Jalparni
1/5

नाशिकच्या गोदावरी नदीला धार्मिक आणि अध्यात्मिक असे विशेष महत्व आहे. या पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य मिळते अशी भावना असल्याने महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक इथे स्नानासाठी येत असतात. मात्र सध्या याच गोदावरीची प्रशासनाच्या अनास्थेमुळे वाईट अवस्था झाली आहे.
2/5

नदीला अनेक ठिकाणी पानवेलींनी विळखा घातला असून नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे.
3/5

तपोवन परिसरात तर जिकडे नजर जाईल तिथपर्यंत पानवेली नजरेस पडत आहेत आणि यामुळे जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात तर आलेच आहे. यासोबतच किनारी दुर्गंधीही पसरली आहे.
4/5

गोदावरीची ही अवस्था बघता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्याच आठवड्यात नाराजी व्यक्त करत गोदावरी तात्काळ प्रदूषण मुक्त करा असे निर्देश महापालिका आयुक्तांसह स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्या सुचनांचे कुठलेही पालन होत नाही.
5/5

खरंतर आजपर्यंत नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून अनेक वेळा न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. पर्यावरणप्रेमीही वेळोवेळी आवाज उठवतात, सरकारकडून देखिल वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात मात्र त्या फक्त कागदापुरतीच मर्यादित राहतात.
Published at : 08 Apr 2022 09:44 AM (IST)
आणखी पाहा






















