एक्स्प्लोर
In Pics : संरक्षण दलाची सज्जता आणि सक्षमता; इंडियन सायन्स काँग्रेसमधून जाणून घ्या...
Nagpur : संरक्षण दलातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (DRDO) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
डीआरडीओच्या दालनात रोबोटबद्दल माहिती जाणून घेताना विद्यार्थी.
1/10

सैन्यातील टँकचेही मिनिएचर या DRDOच्या दालनात ठेवण्यात आले आहे.
2/10

या रोबोटद्वारे तब्बल एक हजार किलो विस्फोटक निकामी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
3/10

दालनाच्या सुरुवातीला आकर्षक ड्रोण ठेवण्यात आला आहे. पाच किलो वजनाचा हा ड्रोण शत्रूच्या सीमेत घुसून पाच किलोमिटर परीसरात टेहळणी करू शकतो.
4/10

विशेष म्हणजे जेसीबीच्या आकाराच्या असलेल्या या उपकरणाला 11 कॅमेरे लागले आहेत. त्यांतून परिसरातील इत्यंभूत माहिती घेता येणे सहज शक्य होते.
5/10

युद्ध जन्य परिस्थितीमध्ये रसायन असलेल्या भागात सैनिकांना जाएचे असल्यास या विशेष सुटचा वापर करण्यात येतो.
6/10

संरक्षण दलातील शस्त्र आणि तंत्रज्ञान आदींची माहिती प्रदर्शित करण्यात आल्यामुळे DRDO चे दालन विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
7/10

‘डिफेन्स जिओ इन्फॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ चंदीगड येथील संस्थेच्या कामकाजाची माहिती एका स्टॉलवर उपलब्ध आहे..
8/10

लढाऊ विमानातून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलचीही प्रतिकृती याठिकाणी ठेवण्यात आली आहे.
9/10

सैन्य दलातील शस्त्रांबद्दल चिमुकल्यांमध्ये कुतूहल असून यासोबत फोटो काढण्यासाठी मुले पालकांना आग्रह करत आहेत.
10/10

सैन्य दलामार्फत दळणवळणासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचीही प्रतिकृती येथे बघण्यास मिलते.
Published at : 05 Jan 2023 08:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























