एक्स्प्लोर
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे तीन तेरा, कुरार ते कांदिवली वाहनांच्या लांबच लांब रांगा
Western Express Highway Traffic Jam : राज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

Mumbai Western Expresssway Traffic Jam
1/8

मुंबईत सध्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे असंख्य मुंबईकरांना कामावर जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
2/8

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीकडून बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
3/8

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरीकडून बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
4/8

कुरार मेट्रो स्थानक ते कांदिवली समता नगर पोलीस स्टेशन दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
5/8

पंधरा मिनिटांच्या अंतराकरता आता जवळपास एक ते सव्वा तास लागत आहे.
6/8

वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले असून कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर ब्रिज तोडून खांब टाकत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
7/8

सध्या या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
8/8

मुंबईकडे जाणारी वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.
Published at : 04 Sep 2024 01:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion