एक्स्प्लोर
बिल गेट्स यांचा भारत दौरा; दिग्गजांच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चा...
आज भारतीय रिझर्व्ह बँक मुंबईला भेट दिली असून , आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या भेटीची चर्चा...
Bill Gates
1/8

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत.
2/8

बिल गेट्स यांनी आरबीआय मुंबईला भेट दिली असून, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याशी चर्चा केली!
3/8

“financial inclusion, payment systems, microfinance and digital lending या विषयावर बिल गेट्स यांच्यासोबत उत्कृष्ट बैठक झाली,” असं दास यांनी बैठकीनंतर ट्वीट केले
4/8

बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर असून काल त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली
5/8

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह अब्जाधीश बिल गेट्स यांची भेट घेतली. या दिग्गजांच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चा आहे. सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे.
6/8

सचिन तेंडुलकर याने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "आपण सर्व अद्यापही विद्यार्थीच आहे. आज मुलांच्या शिक्षण, आरोग्य सेवा आणि दृष्टीकोनावर काम करण्याची संधी मिळाली. सचिन तेंडुलकर फांऊडेशन यावर नेहमीच काम करतो. एकमेंकाच्या विचारांची देवणघेवाण करण्याची संधी मिळाली. धन्यवाद बिल गेट्स'
7/8

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी देखील बिल गेट्स यांची भेट घेतली. "बिल गेट्स सही केलेल्या पुस्तकांची प्रत विनामूल्य भेट मिळाली," असं देखील महिंद्रा यांनी ट्वीट करत सांगितलं
8/8

सचिन तेंडुलकर याला 'धावा'धीश म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज सचिन तेंडुलकरने अंजलीसोबत बिल गेट्स यांची भेट घेतली.
Published at : 01 Mar 2023 01:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















