एक्स्प्लोर
Bandra - Madgaon Express : वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरु, वेळापत्रक ते तिकीट दर संपूर्ण माहिती, एका क्लिकवर
Bandra - Madgaon Express : पश्चिम रेल्वेची वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस आजपासून सुरु झाली आहे. ही एक्स्प्रेस बुधवारी आणि शुक्रवारी वांद्रे टर्मिनसहून सुटेल.
वांद्रे-मडगाव एक्स्प्रेस
1/7

170 वर्ष नंतर पहिल्यांदा वसई पनवेल करून कोकणात ट्रेन जाणार आहे. ही ट्रेन कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. वांद्रे टर्मिनस येथून ही ट्रेन मडगावसाठी सुटेल. ही ट्रेन पश्चिम रेल्वे चालवणार आहे. ही गाडी बुधवार आणि शुक्रवारी वांद्रे येथून सुटेल तर मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सुटेल.
2/7

वांद्रे टर्मिनसहून ट्रेन सकाळी 6.50 मिनिटांनी सुटेल. बोरिवलीला 7.23 वाजता, वसई रोडला,7.50 वाजता, भिवंडी रोडला 8.50 वाजता, पनवेलला 9.55 वाजता, रोहा 11.15 वाजता, वीर 12.00 वाजता, चिपळूणला 13.25, रत्नागिरीला 15.35, कणकवलीत 18.00, सिंधुदुर्ग 18.20, सावंतवाडी रोड 19.00 वाजता थिविमला 20.00 ,करमाळीला 20.30 तर मडगावला 22.00 वाजता पोहोचेल. रोहा आणि रत्नागिरीत ट्रेन 5 मिनिट तर वसई रोडला 25 मिनिटं थांबेल.
Published at : 29 Aug 2024 02:40 PM (IST)
आणखी पाहा






















