उपोषण स्थळी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे.
2/8
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेली दोन दिवस सुरू असलेलं उपोषण हे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सोडलं आहे.
3/8
मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.
4/8
खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली.
5/8
त्यावेळी व्यासपीठावरच त्यांच्यामध्ये चर्चा झाली. लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती.
6/8
त्यानंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
7/8
त्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं.
8/8
त्यांनी पहिला व्यासपीठावर असलेल्या लहान मुलाच्या हातून रस घेत आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रस घेतला. खासदार संभाजीराजेंसोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आपलं उपोषण सोडलं.