एक्स्प्लोर
ST Workers Strike : लालपरीची चाकं थांबली! एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद, प्रवाशांची तारांबळ

RTN_ST_STRIKE3
1/11

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे.
2/11

या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने गुरुवारीही उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने घेतला आहे.
3/11

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार आक्रमक झाले आहेत.
4/11

राज्यातील 250 पैकी 100 डेपो एसटी कामगारांकडून उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आले आहेत.
5/11

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
6/11

परिवहन मंत्र्यांसोबत फिस्कटलेल्या चर्चेनंतर कामगारांकडून उत्स्फूर्तपणे संप घोषित करण्यात आला आहे.
7/11

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला होता.
8/11

जरा ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला तर राज्यातील ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
9/11

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून प्रवासी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांची खूप मोठी अडचण होत आहे
10/11

संपाच्या पार्श्वभूमीवर सरकार आता नेमकी काय भूमिका घेत याकडे लक्ष लागलं आहे.
11/11

या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
Published at : 28 Oct 2021 02:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
