एक्स्प्लोर

Photo: बागेश्वरच नव्हे तर 'हे' बाबाही वादात सापडले...

कुणावर लैंगिक शोषणाचा आरोप तर कुणाची सेक्स टेप व्हायरल, वादात सापडलेले सत्यसाईबाबा, आसाराम, राम रहीम, नित्यानंद आणि राधे मॉं.

Photos

1/14
बागेश्वर महाराजांच्या आधीही राज्यात चमत्कार केल्याचा दावा करणारे अनेक बाबा होऊन गेले. त्यामध्ये आसाराम, बाबा राम रहीम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला, तर नित्यानंदची सेक्स टेप व्हायरल झाली.

2/14
फक्त हिंदू धर्मातच नाही, तसे असे चमत्कार करण्याचा दावा करणारे महाराज हे सर्वधर्मांमध्ये आहेत. सत्य साईबाबा, राम रहीम, आसाराम, रामपाल, निर्मलबाबा, राधे माँ, सॅबॅस्टियन मार्टीन, आणि एक मुस्लिम बाबा आहे... जो बंदुकीतून उपचार करतो अशी मांदियाळीच सुरू आहे.

3/14
महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी वाद उफाळला होता तो सत्य साईबाबांच्या कथित चमत्कारांमुळे. आंध्रप्रदेशच्या पुट्टपर्थीमध्ये जन्मलेले सत्यसाईबाबा हे खऱ्या साईबाबांचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला गेला. मंचावर उभे राहून सत्य साईबाबा हे चमत्कार करुन सोन्याच्या साखळ्या प्रकट करायचे. सत्यसाईबाबांच्या आश्रमात लैंगिक शोषण झाल्याचे आरोपही झाले, पण ते त्यांनी फेटाळून लावले.

4/14
सत्यसाईबाबांच्या नंतर गाजलेलं नाव म्हणजे आसाराम बापू. मूळच्या पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात जन्मलेला आसाराम फाळणीनंतर गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोहोचला. सुरुवातीला टांगा चालवून पोट भरलं, पण नंतर त्याने सत्संगाचा मार्ग पकडला. संन्यास धारण केल्याने आसारामचा भक्तसंप्रदाय वाढू लागला. आसारामने 70 च्या दशकात आपल्या प्रवचनांमधून देशभरात आपले आश्रम थाटण्यास सुरुवात केली. राजकारणातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्याच्या सत्संगामध्ये हजेरी लावल्याने आसारामचा भाव वधारला.

5/14
सन 2016 मध्ये आयकर विभागाने आसारामच्या आश्रमांवर धाड टाकली. या धाडीत 2 हजार 300 कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली. आसारामच्या आश्रमामध्ये त्या वेळी दोन शाळकरी मुलींचे मृतदेह सापडले. या दोन्ही मुलींचा नरबळी दिल्याचा आरोप झाला. शिवाय आश्रमामध्ये अनेक तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचे आरोप होऊ लागले. या प्रकरणी आसारामला अटक झाली. तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे.

6/14
या यादीतलं तिसरं नाव म्हणजे बाबा राम रहीम. हा राम रहीम बाबा कमी आणि फिल्मी स्टार जास्त वाटतोय. पण त्याचं झालंयही तसंच. गुरमीत राम रहीम असं नाव असलेला हा बाबा मूळचा पंजाबी जाट आहे. डेरा सच्चा सौदा या भक्त संप्रदायाचा तो सुरुवातीला अनुयायी होता. पण डेराचे प्रमुख शाह सतनाम यांनी गुरमीत राम रहीमला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

7/14
डेरा सच्चा सौदाचे लाखो अनुयायी होते, त्यामुळे हा संप्रदाय श्रीमंत बनला. पण आश्रमामध्ये साधूंची जबरदस्तीने नसबंदी होत असल्याचा आरोप झाला. 2002 मध्ये राम रहीमच्या आश्रमात साध्वींचं लैंगिक शोषण झाल्याचे आरोप होऊ लागले.

8/14
ही बातमी छापणाऱ्या एका स्थानिक पत्रकाराची हत्याही झाली. कालांतराने त्याची शिष्या हनीप्रीत सिंहची बाबा राम रहीमने केलेल्या लैंगिक शोषणाचे पुरावे दिले. या प्रकरणात, 2017 मध्ये राम रहीमला बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली. राम रहीमच्या अटकेमुळे पंचकुलामध्ये दंगे उसळले आणि त्यात 38 जणांचा मृत्यू झाला.

9/14
यादीतलं पुढचं नाव आहे निर्मलबाबा. निर्मलबाबा आपल्या चित्रविचित्र सल्ल्यांमुळे प्रसिद्ध झाले होते. अशाच एका मधुमेह झालेल्या भक्ताला निर्मलबाबाने खीर खाण्याचा सल्ला दिला. खीर खाल्ल्याने त्याची शुगर वाढली, आणि त्यामुळे आपली तब्येत बिघडली असा आरोप भक्ताने केला. याच आरोपावरुन निर्मलबाबाला अटक झाली. निर्मलबाबावर देशात आणि परदेशातही फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल आहेत.

10/14
यादीतलं पाचवं नाव आहे राधे माँ. राधे माँचं मूळ नाव आहे सुखविंदर कौर. 17 व्या वर्षीच लग्न झाल्यानंतर राधे माँ अध्यात्माकडे वळली. होशियारपूरच्या रामदीन दासांनी तिला राधे माँ असं नाव दिलं. सुरुवातीला पंजाबमध्येच तिने आपला दरबार भरवायला सुरुवात केली. पण कालांतराने तिने आपला दरबार मुंबईत भरवण्यास सुरुवात केली. तिच्या दरबारात बडे सेलिब्रिटी आणि उद्योगपती हजेरी लावू लागले.

11/14
राधे माँच्या नावाने घरांमध्ये 'माता की चौकी'चं आयोजन केलं जाऊ लागलं. त्यासाठी 5 लाखांपासून 35 लाखांपर्यंतची देणगी राधे माँला द्यावी लागायची. या माताच्या चौकीचं आयोजन तिचा सहकारी टल्लीबाबा करायचा. पण 2015 मध्ये या राधे माँचे मिनी स्कर्टमधले फोटो व्हायरल झाले. या फोटोवरुन भक्तांनीच तिच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. राधे माँ अनेकदा आपल्या भक्तांच्या काखेत बसल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. राधे माँवर मुंबईतले उद्योगपती मनमोहन गुप्ता यांचा बंगला हडपण्याचाही आरोप झाला.

12/14
या यादीतलं आणखी एक कुख्यात नाव म्हणजे स्वामी नित्यानंद. वाटेल ते दावे करणे हा नित्यानंद यांचा जणू हातखंडाच पण त्यापेक्षा तो वादात तेव्हा अडकला जेव्हा त्याची एक सेक्स टेप जगासमोर आली. राजशेखर उर्फ स्वामी नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा रहिवासी. वयाच्या बाराव्या वर्षी त्याला दिव्य दर्शन झाल्याचा दावा त्याने केला आणि तेव्हापासून भक्तांना मार्ग दाखवण्याचा सपाटा त्याने लावला.

13/14
पण 2010 साली एक सेक्स सीडी लीक झाली आणि बाबाचे कारनामे उघड झाले. एका प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत बाबाचा प्रणयप्रसंग जगजाहीर झाला. बदनामीमुळे बाबा फरार झाला, पण त्याला लगेच अटक करण्यात आली. त्यावेळी आपण नपुंसक असून, केवळ शवासनाचा अभ्यास करत असल्याचा दावा त्याने केला. जामीनावर बाहेर आल्यावर या बाबाने आपला दरबार पुन्हा थाटला. काही वर्षांपूर्वी त्याने इक्वेडोरजवळ एक बेट खरेदी केलं आणि त्याचं नामकरण कैलासा असं करुन तो सध्या तिथे प्रवचन करतो.

14/14
अर्थात फक्त हिंदू धर्मातच असे भोंदू बाबा नाहीत. तर ख्रिश्चन समाजातही अशा बाबांनी चमत्कारांचे दावे करुन भोळ्या भाबड्या भक्तांना येड्यात काढलं आहे. अशाच एका ख्रिश्चन बाबाचं नाव आहे सॅबॅस्टियन मार्टीन. जादुई बाबा या नावाने सॅबॅस्टियन मार्टीन प्रसिद्ध होता. आपल्या दरबारात येणाऱ्या भक्तांचे असाध्य रोग बरे करण्याचा दावा करायचा. मार्टीन जोरजोरात ओरडून लोकांच्या अंगातले विकार पळवून लावण्याचा दावा करायचा. या जादुई बाबावर अनेक वेळा फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या. तक्रारीनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी तो अनेकदा फरारही झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या बाबाला आव्हान दिलं होतं.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget