एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

In Pics | आगवे; कोरोनाला वेशीवरच रोखणारं कोकणातील गाव

konkanfeature

1/7
जगभरात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. आपल्या गावात किंवा गावच्या वेशीबाहेर कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना स्थानिक आरोग्य विभाग आणि प्रशासन गावकरी आपापल्या परिने करत आहेत. तरीही कोरोनाचा शिरकाव होतोय. कोरोनाला सुरुवात झाली आजवर वर्षही पलटून गेलं. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होत नाही. गावात एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही असे कधी ऐकलय का, आश्चर्य वाटेल ना? हे करून दाखवले आहे चिपळूण तालुक्यातील आगवे गावाने.

2/7
गावोगावी कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत असताना आगवे गावाने मात्र कोरोनाला अजूनही वेशीवरच रोखले आहे. आजपर्यंत या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाअंतर्गत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील आगवे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. एकीच्या जोरावर आणि जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यात यशस्वी ठरले आहे.

3/7
कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी नेहमीच्या सवयीत बदल करून नवीन जीवनशैली आत्मसात करावी लागली. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची फार मोठी मदत झाली. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतीने कोरोनाबाबत केलेले गावातील सर्वेक्षण कोरोनाची चाचणी; गावासाठी विविध सेवाभावी संस्था; कंपन्यांचा सीएसआर फंड आदीतून मिळवलेला निधी आणि साहित्य; कोरोनामुळे झालेला मृत्यू, सारी चे रुग्ण आदींवर आधारित प्रथम तीन ग्रामपंचायतीची निवड केली. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ स्तरावर शासनातर्फे हा गौरव करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील आगवे गावाने प्रथम क्रमांक मिळविला. या ग्रामपंचायतीला रोख बक्षिसे देऊन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

4/7
आगवे गावात ग्रामपंचायतीची कामे एकजुटीने केली जातात. या गावासाठी एकीची ताकद मोठी ठरली असून, त्याचा फायदा कोरोनाच्या परिस्थितीत झाला आहे. कोरोनादूतांनी घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजत प्रत्येक व्यक्तीला आरोग्य स्थितीची माहिती घेतली. आजही शासनाने दिलेल्या ॲप वर नोंदणी घेत आहेत. एखाद्या व्यक्तीला ताप; खोकला;घशात खवखवणे; थकवा; श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारचा त्रास होत आहे काय याचीही माहिती घेतली जात आहे.

5/7
कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, दमा अशा सहव्याधी आहेत काय याची माहिती घेतली जात आहे. तसेच प्रत्येकाला नियमित मास्क लावणे,  वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यक भरल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे, काही सहव्याधी असल्यास नियमित औषधोपचार घेणे अशी विविध प्रकारची माहिती दिली जाते. माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, स्वयंसेवक यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे गेल्या वर्षभरात एकही बाधित रुग्ण या गावात आढळलेला नाही.

6/7
लॉकडाऊन कालावधीत आणि त्यानंतरही संबंधित चाकरमान्यांनी गावच्या एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत केली.तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावली.

7/7
आगवे गावात आठ वाड्या असून, येथे  नेहमी एकजुटीने काम केले जाते.अगदी ग्रामपंचायती कामेही एकमताने केली जातात किंवा ग्रामपंचायतीने राबवलेले प्रत्येक उपक्रमाला विश्वासने साथ दिली जाते.त्यामुळेच कोरोनासारख्या परिस्थितीवर आतापर्यंत मात करण्यात करता आली.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?

Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल

'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल

सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज

Embed widget