एक्स्प्लोर
PHOTO : आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून आधी रस्त्याची पाहणी मग अंडा भुर्जीवर ताव!

Sandeep Kshirsagar
1/7

आपल्या हटक्या अंदाजामुळे कायम चर्चेत असणारे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंडा भुर्जीच्या गाड्यावर जाऊन भुर्जी खाल्ली. यासोबतच कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेतला. बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडच्या रस्त्याचे काम सुरु आहे आणि या रस्त्याच्या कामाच्या पाहणीसाठी रोज आमदार या रस्त्यावर उभे असतात.
2/7

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे बीड शहरात चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. रस्त्याचं काम बघितल्यानंतर आमदारांना भूक लागली तेव्हा त्यांनी बस स्थानकासमोर असलेल्या एका अंडा भुर्जीच्या गाड्यावर जाऊन भुर्जीच्या आस्वाद घेतला आणि कार्यकर्त्यांसोबत चहा देखील घेतला.
3/7

कार्यकार्यामध्ये जाऊन डान्स करणं असो की सभेत सर्वात पुढे येऊन घोषणा देन असो हा आमदारांचा स्वभाव बीडकरांनी या पूर्वी अनुभवलेला आहे आणि त्या नंतर आता थेट अंडा भुर्जीच्या गाड्यावर जाऊन त्यांनी सर्वसामान्याप्रमाणे स्पेशल भुर्जी आणि आम्लेट बनवायला लावलं.
4/7

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर मागच्या आठवडाभरात अनेक नेत्यांनी चौफेर टीका केली. अगदी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यापासून जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर यांनी सुद्धा संदीप क्षीरसागर यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला. मात्र या सगळ्या टीकेनंतर संदीप क्षीरसागर यांनी मात्र या टीकेला अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
5/7

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर मागच्या आठवडाभरात अनेक नेत्यांनी चौफेर टीका केली. अगदी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यापासून जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर यांनी सुद्धा संदीप क्षीरसागर यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला. मात्र या सगळ्या टीकेनंतर संदीप क्षीरसागर यांनी मात्र या टीकेला अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
6/7

यावेळी अमर नाईकवाडे यांनी एकेरी भाषेत संदीप क्षीरसागर यांच्यावर ती टीका केली मात्र यासंदर्भात सुद्धा अद्याप संदीप क्षीरसागर यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
7/7

गेल्या चार दिवसापासून संदीप क्षीरसागर हे सायंकाळी रस्त्याच्या कामावर जाऊन स्वतः पाहणी करतात. रस्त्यावर असलेल्या छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठं मोठ्या व्यवसायिकांपर्यंत सगळ्यांशी बोलत त्यांचे प्रश्न जाणून घेत कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना देत असल्याचे चित्र सध्या बीडकरांना पाहायला मिळत आहे.
Published at : 31 Mar 2022 12:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
