एक्स्प्लोर
Chandrapur : चंद्रपुरात पडलेल्या सॅटेलाईटचं ISROच्या शास्त्रज्ञांकडून निरीक्षण
Chandrapur: ISRO scientists
1/8

2 एप्रिल रोजी अवकाशातून पडलेल्या सॅटेलाईटनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
2/8

चंद्रपुरात पडलेल्या सॅटेलाईटचं आज अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी निरीक्षण केलं.
3/8

आज या वस्तूंच्या अभ्यासासाठी ISRO चे पथक सिंदेवाहीत पोहोचले.
4/8

या वस्तू काय आहेत याच्या अभ्यासासाठी ईसरो आणि डीआरडीओने मदत करावी असे पत्र प्रशासनाने दिले होते
5/8

तिरुअनंतपुरम येथून आलेल्या 2 शास्त्रज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
6/8

यावेळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
7/8

सिंदेवाही, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यात कोसळलेल्या सॅटेलाईटची एक मेटल रिंग आणि 7 बलून सापडले होते.
8/8

शाहजहान एम. आणि मयुरेश शेट्टी या दोन शास्त्रज्ञांच्या चमूने संपूर्ण वस्तूंची पाहणी केली.
Published at : 08 Apr 2022 03:14 PM (IST)
आणखी पाहा






















