एक्स्प्लोर
PHOTO: कांदा चिरताना आईच्या डोळ्यात पाणी आले म्हणून मुलाने बनवला स्मार्ट चाकू
बीड न्यूज
1/6

कांदा चिरताना आईच्या डोळ्यातून पाणी आले म्हणून सातवीच्या मुलाने चक्क स्मार्ट चाकू बनवला.
2/6

बीड जिल्ह्यातल्या कुर्ला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ओमकार शिंदेने ही कमाल केली आहे. त्यासाठी भाऊसाहेब राणे या शिक्षकांची त्याला मदत झाली आहे.
3/6

आई घरात कांदा चिरत असताना तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ते पाहून ओंकारला प्रश्न पडला की आईच्या डोळ्यात कांदा चिरताना पाणी येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो.
4/6

त्यासाठी त्याने एक शक्कल लढवली चाकूच्या मुठीवर एक मोटार लावून तिला पाते बसवले आणि एक स्मार्ट चाकू बनवला.
5/6

या चाकूने कांदा कापताना ओमकारच्या आईच्या डोळ्यातून पाणी येत नसल्याचं त्या सांगतायत. निरक्षर असलेल्या आई-वडिलांना मुलाने केलेल्या संशोधनाच कौतुक वाटतंय.
6/6

ओमकारच्या या प्रयोगाची केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दखल घेतली असून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनासाठी त्याची निवड झाली आहे.
Published at : 11 Mar 2022 10:41 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
























