बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा या ठिकाणी हनुमानाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे.
2/6
साठ फुटांपेक्षा जास्त उंच आणि भव्य अशी हनुमानाची मूर्ती उभारण्यासाठी तब्बल 48 लाख रुपये खर्च करण्यात आले.
3/6
डोंगर पिंपळा गावातील बांधकाम व्यवसायिक गोपाळ पवार यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेखातर ही मूर्ती उभारली आहे
4/6
रेल्वे क्षेत्रातील मान्यवर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. परिसरातील नागरिक या ठिकाणी आता दर्शनासाठी गर्दी करत आहेत
5/6
ही मूर्ती उभी करण्याच्या कामासाठी तब्बल नऊ महिन्याचा कालावधी लागला.
6/6
फायबर ग्लास आणि काँक्रिटचा वापर करुन मूर्ती बनवण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या 35 वर्ष या मूर्तीची झीज होणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.