एक्स्प्लोर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला; केली विधिवत पूजा
President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली.

President Draupadi Murmu Visits Karveer Niwasini Ambabai Devi Temple
1/10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली.
2/10

तसेच एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले.
3/10

यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले.
4/10

सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
5/10

दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली.
6/10

तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली.
7/10

देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी त्यांना दिली.
8/10

देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले.
9/10

श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
10/10

राष्ट्रपती दौऱ्यामुळे कोल्हापूर शहरात अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Published at : 02 Sep 2024 04:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
