एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदी चाळीशीच्या उंबरठ्यावर; कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर; उभ्या पिकांना पाण्याचा वेढा
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदी चाळीशीच्या उंबरठ्यावर असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर वात आहेत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने उभ्या पिकांना पाण्याचा वेढा पडला आहे.

Kolhapur Rain Update
1/12

मागील सहा दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
2/12

गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 39.8 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली.
3/12

सर्वाधिक पावसाची नोंद चंदगडमध्ये 87.5 मिलिमीटर इतकी झाली.
4/12

पंचगंगा नदी आज (24 जुलै) दुपारी 12 वाजेपर्यंत 39.9 फुटांवर पोहोचली आहे. नदी इशारा पातळीवर वाहत आहे. धोका पातळी 43 फुट आहे.
5/12

आज (24 जुलै) सकाळी 11 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे.
6/12

कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु आहे.
7/12

जिल्ह्यात एका राष्ट्रीय महामार्गासह 29 मार्ग बंद आहेत.
8/12

जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.
9/12

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 राज्य मार्ग असून यामधील 9 मार्ग बंद पडले आहेत.
10/12

जिल्ह्यामध्ये एकूण 122 जिल्हा मार्ग आहेत. त्यामधील 20 मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे 29 मार्गांवरील वाहतूक पाणी आल्याने बंद पडली आहे.
11/12

यामध्ये वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.
12/12

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 14 मार्गावरील एसटी सेवा बंद आहे.
Published at : 24 Jul 2023 02:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
