एक्स्प्लोर
Indian Dairy Festival In Kolhapur : दूध व्यवसायात ऑपरेशन शाश्वत आणि स्थिरता राबवण्याची गरज; सतेज पाटील यांचे प्रतिपादन
Indian Dairy Festival In Kolhapur : काही वर्षांपूर्वी मेगा मिल्क डेअरी इव्हेंट सुरू झाल्यानंतर प्रथमच ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल-2023’ आयोजित करण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड करण्यात आली आहे.
Indian Dairy Festival In Kolhapur
1/11

कोल्हापुरात दूध व्यावसायिकांना पशुसंवर्धनाचे ज्ञान आणि डेअरीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवल 2023 चे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
2/11

यावेळी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चितळे, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष श्रीमती कांचनताई पवार, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष हिंदुराव जाधव, गोकुळचे माजी संचालक अरुण नरके साहेब, परिषदेचे आयोजक चेतन नरके उपस्थित होते.
3/11

सध्या दूध व्यवसायात Operation Sustainability and Stability राबवण्याची गरज असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
4/11

NDDBने यात लक्ष घालून दूध व्यावसायिकांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनंती पाटील यांनी परिषदेच्या माध्यमातून केली.
5/11

दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. भविष्यात दूध व्यवसायात व्यावसायिक स्पर्धेला तोंड द्यावे लागणार असून दूध व्यवसायाचं ब्रॅण्डिंग, नव्या संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा, माहितीचा वापर करण्यासाठी NDDB ने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
6/11

दूध व्यवसायाच्या वाढीसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. जनावरांची योग्य गणना आपल्याकडे असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
7/11

दरम्यान, दूध व्यवसायामध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या मदतीने महाराष्ट्राचा एक राज्यव्यापी दुधाचा ब्रँड तयार करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
8/11

दुधाचा व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला तारणारा असल्यामुळे या व्यवसायामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उपपदार्थ तयार करण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
9/11

दूध व्यवसायामध्ये प्रचंड संधी आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना योग्य मार्गदर्शन, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला तारणारा हा व्यवसाय ठरेल, असेही ते म्हणाले.
10/11

डेअरी व्यवसायाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणविरहीत सर्वपक्षीय चळवळ उभारण्याचा प्रयत्न करु, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
11/11

पहिल्या दूध परिषदेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे दरवर्षी अशाप्रकारची दूध परिषद भरवण्यात येईल, असे डॉ. चेतन नरके यांनी सांगितले.
Published at : 21 Jan 2023 10:50 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























