Marathi Family Attack: मराठी कुटुंबाला मारहाण, राज ठाकरेंच्या मनसेचा फायरब्रँड नेता म्हणाला, 'आता यांचा माज उतरवण्याची वेळ आलेय'
Marathi family beaten: कल्याणमधील देशमुख कुटुंबीयांना मंत्रालयातील अधिकारी अखिलेश शुक्ला याने रॉडने मारहाण केली होती. मराठी माणसांचा अपमान.
मुंबई: कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना फटकारले आहे. मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. कल्याणमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी मूळात ही घटना माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातली आहे. या घटनेनंतर त्यांनी एक चक्कार शब्दही काढलेला नाही. एरवी मराठी माणसासाठी गळे काढतात, अशी टीका अविनाश अभ्यंकर यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ अखिलेश शुक्लाला अटक करावी. त्यांच्या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. अन्यथा मनसेस्टाईलने रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल. मनसेने मराठी माणसासाठी काय केलंय रस्त्यावर उतरून हे भूतकाळात पाहिलं आहे. वर्तमान काळातही मनसेची भूमिका तिच राहिल. मंत्रालयात बसून हा हे धंदे करत असेल तर चालणार नाही. मुंबई काय खायचं कुठे रहायचं हे मराठी माणसाला शिकवू नये. मुंबईत पहिलं मराठी माणसाचचं ऐकलं जाईल नंतर इतरांचं आणि हो मराठी माणसासाठी शिवतीर्थची दार ही सदैव उघडी आहेत. मराठी माणसावर अन्याय झाला तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा गार्भित इशारा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला आहे.
मराठी कुटुंबाला मारहाण, राज ठाकरेंच्या मनसेचा फायरब्रँड नेता म्हणाला, 'आता यांचा माज उतरवण्याची वेळ आलेय'
राज्यात सतत मराठी माणसावर हल्ले होतात. या सगळ्यांना निवडणुकीनंतर माज आलाय, यांचा माज उतरवण्याची गरज आहे. जरी मराठी माणूस निवडणुकीमध्ये मराठी माणसाच्या सोबत नसला तरी या मराठी माणसासोबत मनसे असणार. यापुढे अशी कुठली घटना घडली तर मनसे त्याला उत्तर देईल, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.
सरकारने या घटनेमध्ये हस्तक्षेप करायला हवा. नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चालल्या आहेत. हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही. या घटना जर थांबला नाहीत तर मनसेच्या रागाला सामोरे जावे लागेल. अधिवेशन चालू आहे यात काही मराठी आमदार असतील कारण अनेक जण भय्ये परप्रांतीय झाले आहेत. मराठी आमदार असतील तर त्यांनी हा विषय उचलायला हवा.
अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर आम्ही कायदा हातात घेतला तर काय चुकते? मराठी माणसासोबत अशी घटना घडत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देणार. तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल, तर राज ठाकरेंनी सर्व परप्रांतीयांवर झाडू फेरले तर काय चुकते. मनसे अथवा आमचे पदाधिकारी सोडल्यास कोणीही पुढे यायला घाबरते कारण व्होट बँक तुटते. योग्य तो निर्णय घ्यावा नाहीतर मनसैनिकांनी कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा काय अर्थ आहे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.. मराठी माणसावर जर गुन्हा दाखल होणार असेल तर मराठी माणसाचा सरकार आहे का महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे का असा प्रश्न आमच्यासमोर येईल, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
आणखी वाचा