एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आमदार जयश्री जाधवांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
kolhapur expansion : आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, असा बॅनर विधानसभेच्या पायऱ्यांवर झळकावत राज्य सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Kolhapur Expansion
1/10

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज (3 ऑगस्ट) विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत लक्ष वेधले.
2/10

आतापर्यंत हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन, लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही निर्णय झालेला नाही.
3/10

आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, असा बॅनर विधानसभेच्या पायऱ्यांवर झळकावत राज्य सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
4/10

मार्च महिन्यामध्येही त्यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची मागणी केली होती.
5/10

कोल्हापूर शहराची हद्दवाढ 50 वर्षांपासून रखडली आहे.
6/10

त्यातून राज्य व केंद्राच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत असल्याने विकास खुंटला आहे.
7/10

महापालिकेने 2013 पासून 2021 पर्यंत चारवेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. 2014 मध्ये 17 गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्या साऱ्यांवर सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
8/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागवला होता.
9/10

त्यानुसार फेब्रुवारी 2021 मध्ये 18 गावे व दोन एमआयडीसींसह प्रस्ताव सादर केला आहे.
10/10

त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शहराची वाढ नसल्याने नवे उद्योग येत नाहीत.
Published at : 03 Aug 2023 09:34 PM (IST)
आणखी पाहा






















