एक्स्प्लोर
Ambabai Mandir Navratri : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची शारदीय नवरात्रोत्सवातील आठ दिवसातील आठ रुपे!
Ambabai : साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आठ दिवसांमध्ये आठ रुपांमध्ये सजली होती. देवीच्या दर्शनासाठी आजवरचा गर्दीचा विक्रम मोडित निघाला आहे.
Ambabai Mandir Navratri
1/8

करवीर निवासिनी अंबाबाईची शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंहासनारूढ या रूपात पूजा बांधण्यात आली.
2/8

द्वितीय माळेला अंबाबाईची दुर्गा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.
3/8

अंबाबाईची तृतीय माळेला सिद्धीदेवी रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली.
4/8

चौथ्या माळेला अंबाबाईची मदुराई निवासिनी मीनाक्षीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली.
5/8

ललिता पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली.
6/8

सहाव्या माळेला अंबाबाईची भक्ती मुक्ती प्रदायिनीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.
7/8

सप्तमी तिथीला अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.
8/8

शारदीय नवरात्रोत्सवाच्या महाअष्टमी तिथीला महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली.
Published at : 04 Oct 2022 01:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















