एक्स्प्लोर
हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा ईडीची छापेमारी; समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
Hasan Mushrif ED Raid Updates : आमदार हसन मुश्रीफ यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे.
Hasan Mushrif ED Raid Updates
1/10

हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी कागलमध्ये ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे.
2/10

यावेळी मुश्रीफांना भेटण्यासाठी आलेल्या समर्थकांना ईडीच्या कारवाईबाबत माहिती मिळताच चांगलेच संतप्त झाले.
3/10

यावेळी कार्यकर्ते आणि समर्थकांनी थेट प्रवेशद्वारावजवळ येऊन निषेध केला.
4/10

मुश्रीफ यांच्या समर्थनासाठी कागलसह कोल्हापूरहून कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
5/10

मुश्रीफ यांच्या पत्नीला यावेळी भावना अनावर झाल्या.
6/10

सारखं येण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून संपवा, असा शब्दात मुश्रीफांच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे.
7/10

हसन मुश्रीफ अधिवेशनासाठी मुंबईत असून ते कागलमध्ये नाहीत.
8/10

भैय्या माने यांनी समर्थकांसह प्रवेशद्वारात ठिय्या मांडला आहे.
9/10

ईडी कारवाई अगोदरच सोमय्यांना माहिती कशी होते? अशी विचारणा भैय्या माने यांनी केली आहे.
10/10

मुश्रीफांवर झालेल्या कारवाईचा राष्ट्रवादीनं तीव्र शब्दात निषेध केला आहे.
Published at : 11 Mar 2023 12:30 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















