एक्स्प्लोर
Ratan Tata Death : अलविदा अनमोल 'रत्न'...रतन टाटा यांच्या 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहितीयत का?
Ratan Tata Death : भारतातील सर्वात दिग्गज उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजेच रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅंन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
Ratan Tata Death
1/11

सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा हे केवळ व्यावसायिक जगतातल्या त्यांच्या योगदानासाठी ओळखले जात नव्हते तर समाजसेवेसाठी, गरजूंना मदत करण्यासाठीही ओळखले जात होते.
2/11

रतन टाटा हे फक्त एक प्रसिद्ध उद्योजक नव्हते तर मानवता धर्माचे खरे सेवक होते. टाटा उद्योग समूह जगभरात पोहोचविण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे.
3/11

28 डिसेंबर 1937 रोजी रतन टाटा यांचा जन्म झाला. ते नवल टाटा यांचे सर्वात मोठे सुपुत्र होते. 1962 मध्ये ते टाटा समूहात रुजू झाले. 1991 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
4/11

रतन टाटा जेव्हा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केला. त्यांनी टाटा यांना नैतिक मूल्याचे धडे दिले.
5/11

वर्ष 1991 मध्ये त्यांची टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांनी दोन वेळा म्हणजेच 1991 ते 2012 पर्यंत हे पद स्विकारलं.
6/11

रतन टाटा यांना भारताचे तिसरे आणि दुसरे सर्वात मोठा पुरस्कार म्हणजेच नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. तसेच, त्यांना सिंगापूर, इटली, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारद्वारे सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे.
7/11

रतन टाटा यांनी टाटा समूहाला भारत-केंद्रित आणि मोठ्या प्रमाणात भिन्न कंपन्यांच्या समूहातून जागतिक हितसंबंध आणि महसूल स्त्रोतांसह सुसंघटित आणि अत्यंत फायदेशीर कॉर्पोरेट कंपनीत रूपांतरित केले.
8/11

त्यांच्या नेतृत्वाखाली, टाटा समूहाने ब्रिटीश ऑटोमोटिव्ह दिग्गज जॅग्वार आणि लँड रोव्हर, अमेरिकन लक्झरी हॉटेल चेन रिट्झ कार्लटन आणि इटालियन एरोस्पेस निर्माता पियाजिओ यांचे अधिग्रहण केले.
9/11

रतन टाटा यांनी 105 वर्ष जुन्या टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात अनेक अभूतपूर्व कामे केली. एक परोपकारी उद्योगपती म्हणून, त्यांच्या साधेपणा आणि माणुसकीसाठी त्यांची नेहमीच प्रशंसा आणि कौतुक केलं जातं. .
10/11

वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी श्वानांसह लहान प्राण्यांसाठी 20 एकरात पसरलेले 165 कोटी रुपयांचे अत्याधुनिक रुग्णालय बांधले..
11/11

रतन टाटांच्या देखरेखीखाली, टाटा समूह आणि टाटा ट्रस्टने देशाची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तसेच कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यासाठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बांधलेले कॅन्सर रुग्णालय हे सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे.
Published at : 10 Oct 2024 09:56 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























