एक्स्प्लोर
Ram Mandir : राम मंदिरात पुजारी होण्यासाठी 6 महिने खास प्रशिक्षण, त्यानंतरच नियुक्ती; ट्रेनिंगमध्ये खास काय? जाणून घ्या
Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्यांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खास योजना काय आहे जाणून घ्या.
Ayodhya Ram Temple
1/11

Ram Mandir Inauguration : अयोध्येतील भव्य राम मंदिरातील पुजाऱ्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात आली आहे. (PC:PTI)
2/11

एकीकडे प्रभू रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. दुसरीकडे, राम मंदिराच्या पुजाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतरच त्यांची पुजारी पदासाठी निवड केली जाईल. (PC:PTI)
3/11

राम मंदिराच्या पुजाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुजाऱ्यांना सहा महिन्यांचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. (PC:PTI)
4/11

पुजारी पदांसाठी तीन हजारहून अधिक अर्ज आले होते, त्यापैकी 200 पुजाऱ्यांची मेरिट लिस्ट तयार करून त्यानंतर मुलाखती घेऊन 20 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. (PC:PTI)
5/11

अयोध्येतील कारसेवकपुरम येथे 200 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडली. अयोध्येतील दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय पॅनेलने या मुलाखती घेतल्या. (PC:PTI)
6/11

उमेदवारांचं सहा महिन्यांचं प्रशिक्षण धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. (PC:PTI)
7/11

प्रशिक्षणादरम्यान या उमेदवारांना राम मंदिर ट्रस्टकडून दरमहा दोन हजार रुपये पगार मिळणार आहे. यासोबतच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. (PC:PTI)
8/11

ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितलं की, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर पुजारी आणि विविध पदांवर नियुक्त केलं जाईल. (PC:PTI)
9/11

अयोध्येतील भव्य राम मंदिराचं निर्माणकार्य शेवटच्या टप्प्यात आलं आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार असून याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (PC:PTI)
10/11

ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, हिंदू धर्माचे विविध विषय आणि धर्मशास्त्रात प्राविण्य असलेले शिक्षक प्रशिक्षण देतील. (PC:PTI)
11/11

ट्रस्टने या आधीच स्पष्ट केलं होतं की, रामलल्लाची पूजा रामानंदी पंथानुसार केली जाईल, ज्यांचे पहिले आचार्य प्रभू राम होते. (PC:PTI)
Published at : 09 Dec 2023 11:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























