एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 'वारसा' परत, 29 पुरातन वस्तूंची पंतप्रधानांकडून पाहणी
PM Modi
1/7

ऑस्ट्रेलियाने भगवान शिव, भगवान विष्णू आणि जैन परंपरेशी संबंधित 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत, त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली.
2/7

सूत्रांनी सांगितले की, एक ऐतिहासिक पाऊल उचलत ऑस्ट्रेलियाने 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत.
3/7

या पुरातन वस्तूंचे सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या वस्तू अतिशय प्राचीन असून भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिक आहे.
4/7

यामध्ये अने देवी-देवतांच्या मूर्ती, प्राचीन सजावटीचे सामान यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
5/7

या पुरातन वस्तू 'भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य', 'शक्तीची उपासना', 'भगवान विष्णू आणि त्यांची रूपे', जैन परंपरा, चित्रे आणि शोभेच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत.
6/7

यामध्ये प्रामुख्याने वाळूचा खडक, संगमरवरी, कांस्य, पितळ अशा विविध प्रकारच्या साहित्यापासून बनवलेली शिल्पे आणि कागदावर काढलेली चित्रे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
7/7

या पुरातन वस्तू प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा येथील परंपरेचे प्रतिक असल्याची माहिती आहे.
Published at : 21 Mar 2022 02:53 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















