एक्स्प्लोर
Dhangekar vs Mohol : मोहोळांनी बिल्डरची गाडी वापरली? धंगेकरांचा थेट सवाल
पुण्याचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची (Badhekar Builder) आलिशान गाडी वापरत असल्याचा खळबळजनक आरोप धंगेकरांनी केला आहे. 'संवैधानिक पद सांभाळताना खाजगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरुन आहे का?' असा थेट सवाल रवींद्र धंगेकर यांनी विचारला आहे. धंगेकरांनी गाडीचा नंबर (MH 12 SW 0909) जाहीर केला असून, याच बिल्डरला कोथरूडमधील अनेक पुनर्विकास प्रकल्प दिल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर, वेताळ टेकडी बोगदा, एचसीएमटीआर (HCMTR) आणि बालभारती-पौड फाटा रस्त्यासारखे प्रकल्प बढेकर आणि गोखले यांसारख्या बिल्डरांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मोहोळ यांच्या काळातच कामांची टेंडर एक वर्षाऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी देण्यात आली, ज्यामुळे महापालिकेचे नुकसान झाले असेही धंगेकर म्हणाले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement






















