एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा; PM मोदींच्याहस्ते काश्मीर खोऱ्यातील चिनाब ब्रीजवर
काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आज (6 जून) कटरा स्टेशनवरून धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते कटरा येथे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
Narendra modi flag hoisting chinab bridge
1/10

काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आज (6 जून) कटरा स्टेशनवरून धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते कटरा येथे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
2/10

जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकावत आनंद व्यक्त केला. चिनाब ब्रिज आणि देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे ब्रिज अंजी ब्रिजला भेट देत मोदींच्याहस्ते या ब्रीजचे लोकार्पण झाले.
3/10

पंतप्रधान मोदींच्याहस्ते 46 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कटरा स्टेडियममध्ये मोदींनी जाहीर सभेला संबोधितही केले.
4/10

उत्तर रेल्वेच्या कटरा-श्रीनगर मार्गावर 7 जूनपासून वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणार असून आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून सहा दिवस दोन गाड्या धावतील.
5/10

उत्तर रेल्वेने सांगितले की, या ट्रेनमध्ये दोन प्रवास वर्ग आहेत. चेअर कारचे भाडे 715 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 1320 रुपये आहे. सध्या या गाड्या फक्त बनिहाल येथे थांबतील, इतर थांब्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
6/10

स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही, हिमवर्षावाच्या काळात काश्मीर खोरे देशाच्या इतर भागांपासून तुटलेले असते. हिमवर्षावाच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग-44 बंद असल्याने काश्मीर खोऱ्यातील प्रवेश देखील बंद असतो.
7/10

बर्फवृष्टी होत असताना जम्मू ते काश्मीर रस्त्याने प्रवास करण्यासाठी 8 ते 10 तास लागायचे. पण, आता वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर, हा प्रवास केवळ तीन तासांत पूर्ण होईल.
8/10

कटरा-श्रीनगर ट्रेन ही वर्षभर काश्मीरला रेल्वेने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात, नवी दिल्लीहून श्रीनगरमार्गे जम्मूपर्यंत वंदे भारतसह इतर गाड्या चालवण्याची योजना आहे.
9/10

नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस या वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. तथापि, एकही ट्रेन नवी दिल्लीहून श्रीनगरला थेट जाणार नाही.
10/10

दरम्यान, काश्मीर खोऱ्याला वर्षभर रेल्वेद्वारे देशाच्या इतर भागाशी जोडले ठेवण्यासाठी 1997 मध्ये यूएसबीआरएल प्रकल्प सुरू करण्यात आला. तो पूर्ण होण्यासाठी 28 वर्षांहून अधिक काळ लागला.
Published at : 06 Jun 2025 03:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























