एक्स्प्लोर
PM Kisan Scheme: येत्या चार दिवसात तुमच्या खात्यावर 4000 रुपये जमा होणार; तुम्ही आहात का लाभार्थी? जाणून घ्या
पीएम किसान
1/7

पीएम किसान या योजनेतील पुढचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेचा 10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी जमा होणार आहे.
2/7

पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु झाली आहे.
3/7

या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे असे तीन हप्ते देण्यात येतात.
4/7

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
5/7

या योजनेचा फायदा आतापर्यंत 12 कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे.
6/7

जर तुम्हाला नवव्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर नवव्या आणि दहाव्या हप्त्याचे पैसे एकत्रच म्हणजेच 4000 हजार रुपये जमा होऊ शकतात.
7/7

PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in/ भेट द्या. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
Published at : 27 Dec 2021 11:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















