एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

काश्मीरमधील डोडामध्ये जमीन खचण्याचे प्रकार (land subsidence), भयभीत गावकऱ्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

जोशीमठ (Joshimath) पाठोपाठ काश्मीरमध्ये डोडा (Doda) जिल्ह्यात जमीन खचण्याचे (land subsidence) प्रकार होत आहेत. डोडा जिल्ह्यात नई बस्तीमध्ये घरे खचल्याने तब्बल 300 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

land subsidence in Doda kashmir

1/10
काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील नई बस्ती गावात जमीन खचण्याचे प्रकार होत आहेत. डोडा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून नई बस्ती हे गाव 35 किलोमीटरवर आहे. म्हणजे हा परिसर चिनाब नदीच्या खोऱ्यातील. हा प्रदेश पहिल्यापासून म्हणजे 1988 आधी जमीन खचणारा म्हणून ओळखला (subsidence-prone zone) जायचा. पण गेल्या अनेक वर्षांपासून एवढ्या भीषण पद्धतीने जमीन खचलेली नाही. त्यामुळे या परिसरात नवी बांधकामे झाली. घराची वस्ती झाली, त्यालाच नई बस्ती अशी ओळख मिळाली.  (PTI फोटो)

2/10
नई बस्ती गावातील हे दुमजली घर अशा पद्धतीने खचलंय की आता त्याची पुनर्बांधणीही शक्य नाही. या घरातील लोकांना कायमचं विस्थापीत व्हावं लागलं आहे (PTI फोटो)

3/10
भूगर्भातील हालचालीमुळे जमीन खचते. डोडा जिल्ह्यातील हा गावकरी आपल्या घराची अवस्था दाखवत आहे. उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये राहती घरे जशी खचली तसाच हा प्रकार आहे. (PTI फोटो)

4/10
चांगल्या रंगरंगोटी केलेल्या घराची ही बाहेरची बाजू दाखवणारा गावकरी. 1 फेब्रुवारीपासून या परिसरात जमीन खचण्याचे प्रकार सुरु आहेत. प्रशासनाने तब्बल 300 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. (PTI फोटो)

5/10
डोडा जिल्ह्यातील नई बस्ती गावात कधी कोणत्या घराखालील जमीन धसेल हे सांगता येत नाही. सध्या गावातीलच एका मदरशात भयभीत गावकऱ्यांना आश्रय घ्यावा लागला आहे. (PTI फोटो)

6/10
प्रशासनाने सर्व नई बस्ती गावाला सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांनी आपल्या घरातील आवश्यक सामानाची बांधाबांध सुरु केलीय. कारण कधी कोणत्या घराखालील जमीन खचेल आणि घरासह माणसेही जमीन गाडली जातील याची भिती सगळ्यांच्या मनात आहे.  (PTI फोटो)

7/10
या परिसरात दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि वाणसामान-कपड्यांसारख्या वस्तूंचे गाठोडे घेतलेली लोकं सगळीकडे दिसतात. सगळ्यांनाच पोहोचयाचं आहे सुरक्षित स्थळी. जिथे किमान जमीन खचणार नाही. (PTI फोटो)

8/10
काश्मीर मधील चिनाब नदीचं खोरं म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली सौंदर्याची उधळणं.. पण आधी दहशतवादाने आता जमीन खचण्याच्या प्रकोपाने हा भागही शापित नंदनवन झाला आहे. (PTI फोटो)

9/10
जोशीमठ आणि उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग वगैरे परिसरात जमीन खचण्याचे प्रकार झाल्यानंतर अनेक देशी-विदेशी पत्रकारांनी तिकडे गर्दी केली. आता डोडामध्येही अशीच स्थिती आहे. घराचे तडे गेलेल्या भिंती जगाला दाखवण्यासाठी आलेल्यांना आपली परिस्थिती दाखवल्यावर काहीतरी सरकारी मदत मिळेल ही अपेक्षाही असावी (PTI फोटो)

10/10
डोडा जिल्ह्यातील नई बस्तीमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना फक्त भितीने ग्रासलंय. आपल्याकडे भूकंपानंतर जशी परिस्थिती झाली अगदी तशीच. आता थोडासा जरी धक्का बसला की गावकरी रस्त्यावर पाल टाकून झोपतात. तसाच प्रकार डोडातल्या नई बस्ती भागात आहे. इथले गावकरी आता आपल्या घरात जायला तयार नाहीत.  प्रशासनाने भूगर्भ शास्त्रज्ञाचं एक पथक पाठवलं आहे, ते या परिसरातील जमीनींच्या खचण्याच्या कारणांचा शोध घेणार आहे. (PTI फोटो)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?

देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?

Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Markadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Embed widget