एक्स्प्लोर
Turkey Earthquake : क्योंकी इन्सानियत अभी भी जिंदा है... तुर्की महिलेने बचाव करणाऱ्या भारतीय महिला अधिकाऱ्याला केलं Kiss, मनं जिंकतेय NDRF टीम
Turkey Syria Earthquake : तुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागात भारतीय लष्कराकडून युद्ध पातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे.
Indian Army Operation Dost in Turkey Syria
1/13

तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपामध्ये 21,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्की प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य राबवलं जातं आहे.
2/13

भारतीय NDRF ची तीन पथकं तुर्कीमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. भारतीय जवान युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य राबवत आहेत. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
3/13

तुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य करत असलेल्या भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्याच्या गालावर चुंबन घेतानाचा तुर्की महिलेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
4/13

भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे.
5/13

भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
6/13

भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे (Operation Dost) भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे.
7/13

भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे. NDRF ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत.
8/13

तुर्कस्तानमधील हताया (Hatay) येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
9/13

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या ही 21,000 च्या पुढे गेली आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे.
10/13

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ट्वीट करत तुर्कीमधील बचाव आणि मदतीचे फोटो शेअर केले आहेत.
11/13

तुर्कीमधील लष्करी फील्ड हॉस्पिटलने वैद्यकीय, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन वॉर्डमध्ये वैद्यकीय तपासणी सुरु आहे. एक्स-रे लॅब आणि मेडिकल स्टोअर उभारण्याच आलं आहे. येथे बाधित लोकांची 24 तास सेवा केली जाईल.
12/13

तुर्कीमध्ये मृतांच्या संख्येसोबतच जखमींची संख्याही सातत्याने वाढत आहे. भीती, वेदना आणि दु:खाच्या काळातही अनेक देशांमधून येणारी मदत तेथील लोकांना आशा देत आहे.
13/13

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने तुर्की येथे एकूण चार विमाने पाठवली आहेत.
Published at : 10 Feb 2023 02:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
धाराशिव
भारत


















