एक्स्प्लोर
PHOTO : IAS अतहर आमीर खान यांची क्रेझ, फोटो पाहून चाहते घायाळ!

Athar Aamir Khan
1/9

IAS अधिकारी अतहर अमीर खान यांची सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ आहे. ते सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे सहा लाख फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर त्यांना 1.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
2/9

हॅण्डसम हंक अशी आयएएस अतहर आमीर खान यांची इमेज आहे. त्यांनी काल (12 एप्रिल) इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, जो व्हायरल झाला आहे. 4 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. त्यात मुलींची संख्या जास्त आहे. या फोटोवर शेकडो मुलींनी हार्ट इमोजी पाठवून प्रेमही व्यक्त केले आहे.
3/9

2015 मध्ये UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवणारे अतहर आमीर यांची पोस्टिंग सध्या श्रीनगरमध्ये आहे.
4/9

आयएएस अतहर आमीर खान यू-ट्यूबवरही खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिले आहेत. व्हिडीओमध्ये अतहर आमीर खान हे यूपीएससी परीक्षेबाबत टिप्स देतात.
5/9

आयएएस अतहर खूपच देखणे आहेत. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ते सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असतात.
6/9

काही दिवसांपूर्वी IAS अतहर आमीर खान यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टायलिश फोटो शेअर केला होता. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला होता.
7/9

काश्मीरमधील पहिला आयएएस अधिकारी ठरलेल्या अतहर आमीर खान यांनी 2015 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला होता, तर टीना दाबीने यात अव्वल स्थान पटकावलं होतं.
8/9

अतहर आमीर खानने 2018 साली आयएएस टीना दाबीसोबत लग्न केलं होतं. परंतु काही 2020 साली त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
9/9

देशातील हॅण्डसम आयएएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली आहे.
Published at : 13 Apr 2022 04:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
