एक्स्प्लोर
Gujrat Cloudburst : गुजरातमध्ये पावसाचं तांडव! जुनागड परिसर पाण्यात; जोरदार पावसात गुरं आणि गाड्या गेल्या वाहून, पाहा फोटो...
Gujrat Cloudburst: देशभरातील विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. गुजरातमधील (Gujarat) जुनागड भागात ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Gujrat Junagadh Cloudburst
1/7

गुजरातमधील जुनागडमध्ये शनिवारी (22 जुलै) ढगफुटी झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं.
2/7

पाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक गाड्या आणि गुरं वाहून गेली. हवामान खात्याने 23 जुलैला देखील गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
3/7

पावसामुळे अनेक घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचलं होतं. सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी लोक कमरेभर पाण्यातून चालत होते.
4/7

देवभूमी द्वारका, भावनगर, भरूच, सुरत, तापी, वलसाड आणि अमरेली या जिल्ह्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला.
5/7

गुजरातच्या दक्षिणेकडील भाग आणि सौराष्ट्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने धरणं आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर गेली आहे.
6/7

पावसामुळे राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वात वाईट स्थिती आहे. मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.
7/7

हवामान खात्याने अहमदाबादसह सौराष्ट्र, दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येथे अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published at : 23 Jul 2023 09:19 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























