एक्स्प्लोर
GK: हत्तीचे दात इतके महाग का विकले जातात? असं नेमकं त्यापासून काय बनवतात? पाहा...
Facts: बहुतेकजण हत्तीच्या दातांची तस्करी करण्यासाठी त्यांना मारुन टाकतात. पण प्रश्न असा पडतो की हत्तीचे दात विकून नक्की किती पैसे मिळतात, की ज्याच्या लोभापोटी शिकारी इतके क्रूर बनतात. तर पाहा...

Elephant Tusk
1/6

हस्तिदंताची किंमत ही अधिक असते हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण हत्ती दंत इतके महाग का आहेत? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाजारात याला इतकी मागणी का आहे?
2/6

वास्तविक, हस्तिदंताचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. गळ्यात घालण्यासाठीचे हार, मनगटात घातल्या जाणाऱ्या बांगड्या हस्तिदंतापासून तयार केल्या जातात. या दागिन्यांची किंमत हजारोंमध्ये असते.
3/6

हस्तिदंताच्या इतक्या महाग विक्रीमागे समाजातील बडे लोक देखील जबाबदार आहेत. खरं तर उच्चभ्रू लोकांमध्ये हस्तिदंत हा स्टेटस सिम्बॉलचा विषय आहे आणि त्यामुळेच ते इतके महाग विकले जातात.
4/6

जुन्या काळातही राजघराण्यातील लोकांमध्ये हस्तिदंतापासून बनवलेल्या दागिन्यांची क्रेझ होती, त्यामुळे तेव्हाही या दागिन्यांना खूप मागणी होती. बर्याच ठिकाणी हस्तिदंत हा सामान्य संस्कृतीचा एक भाग होता.
5/6

धार्मिक कारणांमुळे आणि अंधश्रद्धेमुळेही हस्तिदंताला मोठी मागणी आहे. हिंदूंचं दैवत असणाऱ्या श्री गणपती बाप्पाला हत्तीच्या रूपात दाखवण्यात आलं आहे, ज्यामध्ये हस्तिदंताचे दात बाहेर येताना दिसतात.
6/6

मात्र, हस्तिदंताचा व्यापार बेकायदेशीर आहे. यासंबंधीचा व्यवसाय केल्यास 'वन्यजीव संरक्षण कायदा' कलम 9 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाते.
Published at : 26 Jun 2023 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion