एक्स्प्लोर
Ayodhya Mosque : राम मंदिरानंतर अयोध्येत मशीद बांधण्याची तयारी! लवकरच बांधकामाला सुरुवात; डिझाईन कशी असेल? जाणून घ्या
Ayodhya Mosque News : अयोध्येत राम मंदिरानंतर मशीद बांधण्याची तयारी होण्याची शक्यता आहे. याचं काम मुंबईच्या टीमकडे देण्यात आलं आहे. काम कधी सुरू होणार, डिझाईन कशी असेल, यासह इतर माहिती जाणून घ्या.

Ayodhya Mosque News Update
1/9

अयोध्येमध्ये एकीकडे राम मंदिर निर्माण कार्य अंतिम टप्प्यात असताना लवकरच मशीद बांधण्याचं कामही सुरु होणार आहे.
2/9

रामजन्मभूमी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अयोध्येतील धन्नीपूर येथील मुस्लिमांना दिलेल्या जमिनीवर लवकरच मशिदीचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे.
3/9

अयोध्येतील मशीद बांधण्याची जबाबदारी मुंबईतील प्रभारी संघाकडे देण्यात आली आहे.
4/9

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना मशिदीच्या बांधकाम समितीचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
5/9

मशीद बांधणाऱ्या 'इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट'चे मुख्य विश्वस्त आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी यांनी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.
6/9

रामजन्मभूमी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अयोध्येतील धन्नीपूर येथील मुस्लिमांना दिलेल्या जमिनीवर मशिदीचे बांधकाम पुढील वर्षी मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
7/9

मशीद विकास समितीच्या अध्यक्षपदी हाजी अराफत शेख यांची नियुक्ती करण्याचा मुख्य उद्देश मशिदीचे बांधकाम गांभीर्याने पूर्ण करणे, हा असल्याचे जफर फारुकी यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर ट्रस्टच्या सल्लागारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.
8/9

अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागी बांधण्यात येणाऱ्या मशिदीचे नाव 'मोहम्मद बिन अब्दुल्ला अयोध्या मशीद' असं ठेवण्यात आलं आहे. पुढील वर्षी मे महिन्यात या मशिदीचे बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
9/9

इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने मशिदीची पुनर्रचना केली असून आता ही मशीद 15 हजार चौरस फुटांऐवजी सुमारे 40 हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधली जाणार आहे. सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधल्या जाणाऱ्या या मशिदीसोबतच हॉस्पिटल, लायब्ररी, कम्युनिटी किचन आणि म्युझियम बांधले जाणार आहे.
Published at : 25 Dec 2023 12:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
