एक्स्प्लोर
तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.
Tuljabhavani temple devotee
1/7

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.
2/7

देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे. कारण, पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आलं आहे.
3/7

मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय होणार असली तरी, 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत भाविकांना देवीचं फक्त मुखदर्शन घेता येणार आहे.
4/7

तुळजाभवानी देवीच्या इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
5/7

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील 10 दिवस भाविकांना मुखदर्शनच घेता येईल.
6/7

दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात सुरु असलेल्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला होता. चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराचे संवर्धनाचं काम होत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.
7/7

मंदिर संवर्धन करत असताना भिंतीवर केलेले ब्लास्टिंग चुकीचे असल्याची माहिती देत यापूर्वी संभाजीराजेंनी कामावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर, आता पुरातत्व विभागाकडून पुन्हा काम सुरू करण्यात येत आहे.
Published at : 30 Jul 2025 03:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण























