एक्स्प्लोर
PHOTO : कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं?, थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो
छत्रपती संभाजीनगर : शिंदें समितीच्या शिफारशीनंतर राज्य सरकारकडून कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरणास सुरुवात झाली आहे.
Kunbi certificate process
1/10

मराठवाड्यातील आठही जिल्यात मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात 75 पेक्षा जास्त मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
2/10

मात्र, कुणबी जात प्रमाणपत्र मिळतात कसे, कशा पद्धतीने हे सगळं काम चालतंय, तुम्हाला कोणते कागदपत्रे सोबत न्यावे लागणार, शासनाचे कोणते कागदपत्र तुमच्या फायद्याचे ठरणार याबाबतचा आढावा 'एबीपी माझा'ने घेतला आहे.
3/10

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 1967 च्या अगोदरचा कुठलाही पुरावा आवश्यक, ज्यावर कुणबी असल्याची नोंद असायला हवी.
4/10

या पुराव्यात खासरा पत्र, पाहणी पत्र, कुळ नोंद वही, नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना न. 1 हक्कनोंद पत्रक, सातबारा उतारा, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम नोंद वही, आदी कुणबी नोंद असलेले कागद, मोडी, उर्दू, भाषेत असलेले दस्तावेज भाषांतर करून अटेस्टेड करून घेणे
5/10

सोबतच अर्ज करतांना 100 रुपयांच्या बॉण्डवर वंशावळ प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याचं गरजेच असेल.
6/10

अर्ज करणारा व लाभार्थींचे टिसी, आधार कार्ड असे कागदपत्र देखील असायला पाहिजे.
7/10

वरील सर्व कागदपत्र घेऊन आपले सरकार केंद्र, पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
8/10

अर्ज केल्यानंतर सदरील अर्ज त्या-त्या तहसील, उपविभागीय अधिकारी स्तरावर या सर्व कागदपत्रांची छाननी केली जात आहे.
9/10

उमेदवाराने ज्या विभागाची कुणबी असलेली नोंद कागदपत्र दिले आहे, त्या विभागाकडून सरकारी पातळीवर हे कागदपत्र खरे असल्याचा निश्चित केले जाणार.
10/10

सर्व कागदपत्र व्यवस्थित असले की, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून त्यांच्या स्तरावर कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार.
Published at : 07 Nov 2023 03:41 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















