एक्स्प्लोर
Dhananjay Munde Beed: मुस्लीम बांधवांची गोल टोपी घातली, फोन लावून लोकांचे प्रॉब्लेम सोडवले, जगमित्र कार्यालयात धनुभाऊंचा जनता दरबार
Dhananjay Munde in beed: संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे हे सक्रिय राजकारणापासून गेले काही दिवस दूर होते. मात्र, आता ते लोकांमध्ये जाताना त्यांच्या समस्या सोडवत आहेत.
Beed News Dhananjay Munde
1/8

राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी परळीत नागरिकांशी संवाद साधला.
2/8

परळी येथील जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडे यांचा जनता दरबार भरला होता.
3/8

यावेळी धनंजय मुंडे यांनी नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्याचे निराकरण केले.
4/8

यावेळी परळीतील मुस्लीम बांधव धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी आले होते.
5/8

या मुस्लीम बांधवांनी धनंजय मुंडे यांना त्यांची पारंपरिक टोपी भेट दिली.
6/8

धनंजय मुंडे यांनी ही टोपी डोक्यावर घालून मुस्लीम बांधवांचा मान राखला.
7/8

लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे जगमित्र कार्यालयाला जनता दरबाराचे स्वरूप आले होते.
8/8

धनंजय मुंडे हे बऱ्याच दिवसांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन मिसळले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि करुणा शर्मा प्रकरणामुळे ते गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते.
Published at : 12 Apr 2025 02:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























