एक्स्प्लोर
सनरूफसह आहे जबरदस्त इंजिन, अशी आहे नवीन Maruti Suzuki Brezza
Brezza new review
1/6

देशात मारुती सुझुकी आपल्या आकाराने लहान गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. कंपनीने नुकतीच आपली नवीन अपडेटेड Brezza एसयूव्ही लॉन्च केली आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीची ही कार आधी Vitara Brezza म्हणून ओळखली जात होती. मात्र यातून आता Vitara हे नाव वेगळे करण्यात आले असून नवीन कार आता फक्त Brezza म्हणून ओळखली जाणार आहे. याच कारबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
2/6

नवीन ब्रेझा आकाराने मोठी आहे. याच्या डिझाइनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. ऑल-न्यू मारुती सुझुकी ब्रेझाची पुढील बाजू जुन्या मॉडेलच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी दिसते. यात नवीन LED DRLs आणि ग्रील देण्यात आली आहे. जी पाहताच तुम्हाला तुम्हाला नक्कीच आवडेल. याचा नवीन हेडलॅम्प सेटअप तुमचं लक्ष वेधून घेईल. याचा नवीन बंपर खूप उठून दिसतो. मात्र याचे फॉग लॅम्प आकाराने लहान आहेत.
Published at : 07 Jul 2022 09:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























