एक्स्प्लोर
Vespa स्कूटरसाठी लोकप्रिय असलेली LML चे बाजारात पुनरागमन? तीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार
LML BIKE
1/10

आपल्या Vespa स्कूटरसाठी लोकप्रिय असलेली एलएमएल कंपनी भारतात पुन्हा आगमनासाठी सज्ज झाली आहे. या कंपनीचे स्कूटर 1990 च्या दशकात खूप लोकप्रिय तर झालेच, पण ते खूप स्टायलिश ही होते. कंपनी पुन्हा भारतात पदार्पण करणार आहे, मात्र यंदा पेट्रोल नाही तर कंपनी इलेक्ट्रिक वाहन घेऊन येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एलएमएल कंपनी 29 सप्टेंबर 2022 रोजी भारतात तीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार आहे.
2/10

LML च्या तीन इलेक्ट्रिक उत्पादनांमध्ये हायपरबाईक, एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक परफॉर्मन्स बाईकचा समावेश असेल. कंपनीने गेल्या वर्षीच बाजारात पुनरागमन करण्याची आपली योजना उघड केली होती, परंतु कंपनीने अद्याप या वाहनांबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
Published at : 25 Sep 2022 09:06 PM (IST)
आणखी पाहा























