लक्झरी कार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशात सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये स्मार्ट कार मिळणं म्हणजे मोठं गिफ्टच. अशीच एक कार आता पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे. भारतात Citroen C3 ही कार पुढील महिन्यात लॉन्च होतेय.
2/6
भारतात कॉम्पॅक्ट SUV Car ची होणारी बंपर विक्री पाहून ही कार तयार करण्यात आली आहे. Citroen ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रीमियम लाँच केली होती. आता नवीन Citroen C3 Car 20 जुलैला लॉन्च होणार आहे. तर या कारची बुकिंग 1 जुलैपासून सुरु होणार आहे. या कारचे कोणकोणते फीचर्स आहेत ते जाणून घ्या.
3/6
Citroen C3 कारच्या इंटर्नल भागात पाहिल्यास यामध्ये, ग्रे आणि ऑरेंज असे शेड दिले आहेत. तर त्यामध्ये 10-इंच टचस्क्रीन अधिक वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, फ्रंट/रियर यूएसबी फास्ट चार्जिंग प्लस ड्युअल एअरबॅग्ज, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, मागील पार्किंग सेन्सर्स यांसार्खे फीचर्स आहेत.
4/6
C3 ची लांबी 3,981mm, रुंदी 1,733mm आणि उंची 1,586mm आहे. ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे तर व्हीलबेस 2,540 मिमी आहे. ही कार दोन पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाईल. तसेच रेंज 86ps सह 12.l पेट्रोल आणि अधिक पॉवरफुल 110ps 1.2l टर्बो पेट्रोलसह सुरू होईल. यामध्ये 1.2l पेट्रोलची इंधन कार्यक्षमता 19.8 kmpl आहे. तर, टर्बो पेट्रोल 19.4 kmpl आहे. 1.2l टर्बोमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
5/6
Citroen C3 कंपनीचा असा दावा आहे की, हाय सीट तसेच, कारमध्ये कूलिंगसाठी AC डिझाइन तसेच 315l बूट स्पेस आहे. C3 4 सिंगल टोन आणि दोन ड्युअल टोन रंगांसह 56 कस्टमायझेशन पर्यायांसह 3 पॅकसह येईल. प्लस 70 अॅक्सेसरीज डीलर स्तरावर ऑफर केल्या जातील.
6/6
Citroen C3 ही कार मारुती विटारा ब्रेझा, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या कारला टक्कर देणार असे बोलले जात आहे.