उमा पेंढारकर विवाहित असून ती नाट्यतपस्वी भालजी पेंढारकर यांची नातसून आहे. ऋषिकेश पेंढारकर असं तिच्या पतीचं नाव आहे.
2/9
स्वामिनी ही उमा पेंढारकरांची पहिलीच मालिका असून तिने यात पार्वतीबाईंची व्यक्तिरेखा साकारली. मालिकेतील तिच्या अभिनयाला सगळ्यांनीच पसंती दर्शवली.
3/9
तिने 'संशकल्लोळ' नाटकातून नाट्यसृष्टीत पदार्पण केलं. या नाटकात तिने रेवती हे पात्र साकारलं. नाटकात तिच्यासोबत प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे होते.
4/9
उमा पेंढारकरला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. तिने कथ्थकमध्ये विशारद केलं आहे. तसंच तिला शास्त्रीय गायनाचीही आवड आहे.
5/9
'स्वामिनी' या कलर्स मराठीवरील मालिकेतील पार्वतीबाई म्हणजेच अभिनेत्री उमा हृषीकेश स्वतः एक क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट देखील आहे.
6/9
7/9
उमा पेंढारकर मूळची रायपाटणची असून तिचं शिक्षण मुंबईत झालं.
8/9
तेजश्रीच्या जागी आता उमा पेंढारकर ही अभिनेत्री दिसणार आहे. उमाने यापूर्वी 'स्वामिनी' मालिकेत पार्वतीबाईंची भूमिका साकरली होती.
9/9
'अग्गंबाई सासूबाई' मालिका बंद होणार असून त्याजागी 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका दिसणार आहे. या मालिकेतील सर्व पात्रे तिच असून शुभ्राची भूमिकेत तेजश्री प्रधान नसेल.