एक्स्प्लोर
Stress or Depression : ताण आणि नैराश्यात मोठा फरक! 'ही' लक्षणं फार कमी लोकांना माहीत
Stress or Depression : आजकाल अनेक लोक ताण आणि नैराश्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. ताण वेळ, विश्रांती आणि व्यायामाने कमी होतो, पण डिप्रेशनसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Stress or Depression
1/13

आजकाल अनेक लोकं ताण आणि नैराश्याने त्रस्त आहेत. असे बरेच जण आहेत ज्यांना समजत नाही की ते तणावात आहेत की नैराश्यात.
2/13

सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसाकडे विश्रांतीसाठी वेळ उरलेला नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कारणाने त्रास असतोच.
3/13

कोणाला नोकरीमुळे, कोणाला शिक्षणामुळे, तर कोणाला नातेसंबंधामुळे ताण हा येतोच. जास्त कामाचे त्रास आणि जबाबदाऱ्या माणसाला मानसिक थकवा आणतात.
4/13

या काळात आपण दोन गोष्टी अनुभवायला मिळतात ताण आणि नैराश्य. पण अनेक लोकांना या दोन्हींतला फरक समजत नाही.
5/13

WHO च्या मते, ताण हा कामाच्या दबावामुळे निर्माण होतो. ताण म्हणजे डिप्रेशन नव्हे.
6/13

ताणाची तीन प्रमुख लक्षणे असतात जसे की, थकवा, कामापासून दुरावा आणि नकारात्मक विचार.
7/13

जर काम करायची इच्छा संपली आणि सर्व काही ओझं वाटू लागलं, तर तो ताण असू शकतो.
8/13

नैराश्य म्हणजे मानसिक आजाराचे एक रूप आहे. डिप्रेशनमुळे व्यक्तीचे संपूर्ण जीवन प्रभावित होते.
9/13

डिप्रेशनची लक्षणे म्हणजे सतत उदासी, निराशा आणि आवडीच्या गोष्टींमध्ये रस कमी होतो. यामुळे झोप आणि भूक दोन्ही लागत नाही.
10/13

काही लोक स्वतःला दोष देतात आणि धोकादायक विचार करू लागतात. संशोधनानुसार, जर त्रास फक्त कामाशी संबंधित असेल, तर तो ताण आहे.
11/13

पण जर उदासी जीवनाच्या प्रत्येक भागात दिसत असेल, तर ते नैराश्य आहे.
12/13

ताण आराम, झोप, व्यायाम आणि संतुलित आहाराने कमी होऊ शकतो, पण डिप्रेशनसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
13/13

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 26 Oct 2025 02:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
























