एक्स्प्लोर
Hindu Rituals: हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत? तर 'ही' आहेत या मागील काही कारणं
Hindu Rituals: हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाची पूजा करताना त्यात नारळ समाविष्ट केला जातो. नारळाशिवाय कोणतीच पूजा किंवा यज्ञ संपन्न होत नाही. पण महिला नारळ का फोडत नाही? हे तुम्हाला माहीत आहे का?
why women do not break coconuts
1/9

नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. असं म्हणतात की, देवाला नारळ चढवल्याने पैशांची समस्या आणि धन-संपत्तीबद्दल समस्या दूर होतात. पुजेनंतर हेच नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो. मात्र, हे नारळ स्त्री कधीच फोडत नाही, हे अनेकांना माहिती नाही.
2/9

धार्मिक मान्यतेनुसार, नारळ हे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेलं फळ मानलं जातं. पृथ्वीवर प्रथमच भगवान विष्णूने देवी लक्ष्मीसोबत नारळ फळ म्हणून पाठवलं होतं. नारळावर फक्त लक्ष्मीचा अधिकार आहे, त्यामुळे माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.
3/9

पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचं झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत, याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असंही म्हणतात.
4/9

ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव नारळात वास करतात, असं मानलं जातं. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे महिलांनी नारळ फोडू नये असं म्हणतात.
5/9

नारळ हे बीज मानलं गेलं आहे आणि स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते, म्हणून नारळ फोडणं स्त्रियांसाठी योग्य मानलं जात नाही.
6/9

असं म्हटलं जातं की, जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात.
7/9

शास्त्रामध्ये स्त्रियांनी नारळ फोडणं अशुभ असल्याचं सांगितलं जातं.
8/9

तुम्ही देखील नेहमी मंदिराचे पंडित किंवा घरातील पुरुषांनाच नारळ फोडताना पाहिलं असेल.
9/9

अनेक पौराणिक कथांमुळे हिंदू धर्मातील स्त्रिया नारळ फोडत नाहीत.
Published at : 17 Sep 2023 02:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
