एक्स्प्लोर
Health Tips : ब्रश करताना 'अशी' काळजी घ्या; जाणून घ्या 5 सोप्या टिप्स
आपला टूथब्रश लाखो जंतूंचं घर बनू शकतं, जर त्याची योग्य काळजी घेतली नाही तर. दर तीन महिन्यांनी ब्रश बदलणे आणि तो स्वच्छ, कोरड्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.
Health Tips
1/10

आपण दिवसातून दोनदा ब्रश करतो, पण तो ब्रश किती स्वच्छ आहे याचा आपण कधीच विचार करत नाही.
2/10

टूथब्रशमध्ये अनेक प्रकारचे जर्म्स, बॅक्टरीया, वायरस, फंगस दडलेले असतात. हे जर्म्स तुमच्या तोंडातून, हातांमधून आणि बाथरूमच्या वातावरणातून टूथब्रशपर्यंत पोहोचतात.
3/10

प्रत्येक वेळी तुम्ही ब्रश करताना तुमच्या तोंडातली लाळ, बॅक्टेरिया आणि अन्नाचे कण ब्रशमध्येच राहतात.
4/10

जर तुमचा ब्रश टॉयलेटजवळ ठेवला असेल, तर फ्लशमधून उडणारे मायक्रो ड्रॉप्लेट्स त्यावर जर्म्स पसरवतात. त्यामुळे तुमचा टूथब्रश योग्य पद्धतीने ठेवणे आणि वेळेवर बदलणे गरजेचे आहे.
5/10

तोंडातील जंतू दररोज तुमच्या ब्रशवर जमा होतात. टॉयलेट फ्लश करताना हवेत उडणारे कीटाणू देखील ब्रशवर बसतात.
6/10

जर तुमच्या ब्रशचे ब्रिसल्स वाकलेले किंवा झिजलेले असतील तर त्यापूर्वीच नवीन ब्रश घ्या किंवा दर 3-3 महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला.
7/10

लहान मुलं आणि कमी इम्युनिटी असलेल्या लोकांनी दर 6 ते 8 आठवड्यांनी ब्रश बदलावा आणि जर तुम्हाला सर्दी-खोकला असेल तर नक्कीच तुमचा टूथब्रश बदला.
8/10

दरवेळी तुमचा टूथब्रश वापरल्यानंतर स्वच्छ धुवा आणि दोन ब्रश एकमेकांना लागणार नाहीत याची काळजी घ्या.
9/10

तुमचा ब्रश कधीही झाकलेल्या डब्यात ठेवू नये, कारण ओलसरपणामुळे बॅक्टेरिया वाढतात. तुमचा टूथब्रश नेहमी टॉयलेटपासून किमान दोन मीटर अंतरावर ठेवा.
10/10

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 24 Oct 2025 04:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























