एक्स्प्लोर
Ayurvedic Face Serum : हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी 'हे' आयुर्वेदिक सिरम म्हणजे वरदानच!
Ayurvedic Face Serum : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करून नैसर्गिक तेज मिळवा. घरच्या घरी बनवा हा आयुर्वेदिक सिरम आणि त्वचेला द्या नवा ग्लो.
Ayurvedic Face Serum
1/12

हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण या काळात हवेतला कोरडेपणा वाढतो.
2/12

यामुळे आपल्या त्वचेवर कोरडेपणा, सुरकुत्या आणि निस्तेजपणा दिसू लागतो.
3/12

अशा वेळी त्वचेला पुरेसा ओलावा देणं आणि तिचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं असतं.
4/12

अनेक लोकं महागडे प्रॉडक्ट्स वापरयाला सुरु करतात. पण नेहमी याचा रिझल्ट अनेकांना नाही मिळत.
5/12

जर तुमची त्वचा सुद्धा हिवाळ्यात कोरडी पडत असेल तर, तुम्ही घरच्या घरी हे आयुर्वेदिक सिरम तयार करू शकता.
6/12

हे नियमितपणे वापरल्याने तुमच्या त्वचेवर एक वेगळा ग्लॉ येऊ शकतो.
7/12

हे सिरम पूर्णतः नैसर्गिक असून त्यात कोणतंही रसायन नसतं. यामुळे ते त्वचेला नुकसान न करता तिचा नैसर्गिक तेज वाढवतं.
8/12

फेस सिरम तयार करण्यासाठी, प्रथम एक स्वच्छ काचेचं भांड घ्या आणि त्यात एक चमचा बीटरूट पावडर टाका.
9/12

त्यानंतर, ऍलो वेरा जेल, गुलाब पाणी, व्हिटॅमिन E कॅप्सूल, ग्लिसरीन आणि तिळाचं तेल हे सर्व घटक एकत्र करा.
10/12

तयार झालेलं सिरम एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा आणि दररोज दिवसातून दोनदा चेहऱ्यावर लावा.
11/12

नियमित वापराने तुमची त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी दिसू लागेल.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 03 Nov 2025 03:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























