निरोगी राहण्यासाठी आहारात सुक्या फळांचा समावेश करा. रोज ड्रायफ्रूट खाल्ल्याने हृदय, मन आणि शरीर तंदुरुस्त राहते. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. दररोज 2-3 अक्रोड (Walnut) खाणे आवश्यक आहे.
2/7
अक्रोड मेंदूला तीक्ष्ण आणि सक्रिय बनवते. प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, तांबे आणि सेलेनियम सारखी पोषक तत्वे अक्रोडात मोठ्या प्रमाणात आढळतात. अक्रोड खाल्ल्याने हृदय निरोगी आणि मजबूत होते. जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे.
3/7
अक्रोड खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात, जे हृदयरोगांवर फायदेशीर असतात.
4/7
मधुमेहामध्येही अक्रोडाचा फायदा होतो. टाईप 2 मधुमेहासाठी हे खूप प्रभावी आहे. अक्रोड रक्तवाहिन्या विस्तृत करतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोम कमी करतात.
5/7
नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते आणि कर्करोगाचा धोकाही कमी होतो. अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि केस मजबूत होतात.
6/7
अक्रोड मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते.
7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.