दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार पावसाळा वगळता प्रत्येक ऋतूत दही खाणं फायदेशीर ठरतं. दह्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर ते आयुर्वेदिक पद्धतीनं खावं.
2/8
भारतात अनेकांच्या आहारात दही प्रामुख्याने आढळते. दही जरी दुकानात सहज मिळत असलं तरी गावासह शहरातही अनेक जण घरीच दही बनवतात. दही खाण्यासाठी स्वादिष्ट असतच पण ते पौष्टिकही आहे. दही साखर मिसळून खाल्लं जातं. याशिवाय कोशिंबीर बनवूनही दह्याचा आहारात समावेश केला जातो. दह्याचे आयुर्वेदिक फायदे आहेत.
3/8
दह्याचे पांढरे दही आणि लाल दही असे दोन प्रकार आहे. आयुर्वेदानुासर कोशिंबीर बनवताना पांढऱ्या दह्यापेक्षा लाल दह्यांचा वापर योग्य मानला जातो. पांढरे दह्याचा रायता बनवून जेवणासोबत सेवन करणे चुकीचं आहे.
4/8
आयुर्वेदानुसार पांढऱ्याचे दह्याचे सेवन जेवणासोबत करु नये. खास करुन पांढऱ्या दह्यामध्ये मीठ मिसळून खाऊ नये. यामुळे तुमचं पचन बिघडू शकतं.
5/8
तुम्ही पांढरं दही सकाळी नाश्तानंतर आणि दुपारी जेवणा आधी साखर मिसळून खाऊ शकता.
6/8
तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी तुम्ही दिवसातून तीन ते तार वेळा पांढरं दही साखर मिसळून खाऊ शकता.
7/8
पांढऱ्या दह्याचा उपयोग कढी बनवताना मुळीच करु नका. हे तुमच्या पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरेल.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.