एक्स्प्लोर
Milk Intolerance : दूध पिल्यानंतर होतोय त्रास? जाणून घ्या त्यामागचं कारण!
Milk Intolerance : दूध पिल्यानंतर पोट फुगतं किंवा जुलाब होत असतील, तर ते लॅक्टोज इनटॉलरन्सचं लक्षण असू शकतं. जाणून घ्या...
Milk Intolerance :
1/9

काही लोकांना जुलाब होतात तर काहींना बद्धकोष्ठता होते आणि काही वेळा त्वचेवर लाल चकत्ते येतात.
2/9

अशा लोकांना दूध पिल्यानंतर त्यांचे पोट फुगते, गॅस आणि जुलाब यांसारख्या समस्या जाणवतात.
3/9

जर तुमचं शरीर पुरेसं लॅक्टेज तयार करत नसेल तर तुम्हाला लॅक्टोज पचणार नाही. त्यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
4/9

आपल्या लहान आतड्यात लॅक्टेज नावाचा एन्झाइम असतो आणि ते लॅक्टेज एन्झाइम लॅक्टोज पचवण्याचे काम करतो.
5/9

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर हा त्रास जाणवतो. पोट फुगणे हा लॅक्टोज इनटॉलरन्सचा प्रमुख लक्षण आहे.
6/9

दूध पिल्यानंतर काही लोकांना थकवा आणि डोकेदुखीही जाणवू शकते आणि सांध्यात वेदना जाणवतात.
7/9

लॅक्टोज इनटॉलरन्स आशिया आणि आफ्रिकन लोकांमध्ये जास्त दिसून येते. दूध पिल्यानंतर काही तासांतच लक्षणं दिसू लागतात.
8/9

जर लक्षणं गंभीर असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या समस्येसाठी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टकडे तपासणी करणं योग्य ठरेल.
9/9

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 30 Oct 2025 05:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























